लाहौर – पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ, इम्रान खान यांना सत्तेतून काढून टाकल्यानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले गेले होते.
#WATCH | Shehbaz Sharif, Pakistan opposition leader, elected new PM
Source: PTV pic.twitter.com/lYcOeYbwQp
— ANI (@ANI) April 11, 2022
शाहबाज शरीफ हे कट्टर वास्तववादी असून गेल्या काही वर्षांत त्यांनी स्पष्टवक्ता म्हणून नाव कमावले आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे ते धाकटे भाऊ आहेत. 70 वर्षीय शाहबाज हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठरावाला बहुमत मिळाल्याने इम्रान खान यांना पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान झाले आहे.