मुंबई – पहिल्या तिमाहीत बजाज ऑटोच्या नफ्यात 60 टक्क्यांनी घट झाल्यामुळे आज या कंपनीच्या शेअरचा भाव 1 टक्क्यांनी कमी झाला. पहिल्या तिमाहीत कंपनीला केवळ 395 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षी कंपनीला या तिमाहीत 1,012 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
दरम्यान, निर्देशांक उच्च पातळीवर असल्याने गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्यामुळे शेअरबाजार निर्देशांकांत घट झाली.
बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 58 अंकांनी कमी होऊन 37,871 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 29 अंकांनी कमी होऊन 11,132 अंकांवर बंद झाला. एचयूएल, टाटा स्टील, इन्फोसीस, मारुतीला विक्रीचा फटका बसला.