नवी दिल्ली -सार्वजनिक क्षेत्रातील महाराष्ट्र बॅंकेला केंद्र सरकारने 205 कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध केले आहे. 30 मार्च रोजी हे भाग भागभांडवल बॅंकेला देण्यात आले. या घडामोडीनंतर सोमवारी महाराष्ट्र बॅंकेच्या शेअरच्या भावात साडेपाच टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.
या व्यवहारसाठी महाराष्ट्र बॅंकेच्या भागधारकांनी गेल्या आठवड्यातच परवानगी दिली होती. अगोदर या बॅंकेत केंद्र सरकारचे 87.01 टक्के भागभांडवल होते आता ते 87.74 टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे बॅंकेची आर्थिक परिस्थिती आणखी भक्कम झाली असल्याचे समजले जाते. बॅंकेची परिस्थिती सुधारल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने अगोदरच निर्बंध कमी केले आहे. त्यामुळे बॅंकेची कर्जवितरण क्षमता वाढली आहे.