आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाची रेल्वे व नागरी उड्डयन खात्यास नोटीस

नवी दिल्ली – आचारसंहिता भंगाच्या आरोपावरून निवडणूक आयोगाने रेल्वे बोर्डाचे चेअरमन आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. २७ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने रेल्वे आणि नागरी उड्डयन मंत्रालयास पत्र लिहून आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर देखील पीएम मोदी यांची चित्रे, रेल्वे तिकिटावरून आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवरून का काढून टाकली नाहीत, असे विचारण्यात आले होते.

रेल्वेत मैं भी चौकीदार अशी घोषणा लिहिलेल्या पेपर कपांमधून चहाचे वाटप होत असल्याचे निदर्शनास आले होते, तर याआधी एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवर मोदी यांचे छायाचित्र होते. लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशभरात आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या तक्रारींची दखल निवडणूक आयोगाकडून तातडीने घेण्यात आली होती.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.