मुंबई – गुगल प्लसची सेवा 2 एप्रिलपासून बंद होणार आहे. गुगलकडून यावरील सर्व वापरकर्त्यांची माहिती 2 एप्रिलपासून काढण्यात येणार आहे. ही सेवा बंद करण्याची घोषणा गुगलने गेल्या वर्षी केली होती. त्यासाठी गुगलने फेब्रुवारी 2019 पासून गुगल प्लसचे विविध फिचर्स ऑफलाइन करण्यास सुरुवात केली होती. आता कंपनीकडून वापरकर्त्यांची माहिती नष्ट करण्यात येणार आहे.
दरम्यान, इंटरनेट अर्काइव्ह आणि अर्काइव्ह टीमने गुगल प्लस वरील सर्व सार्वजनिक माहिती साठवून ठेवण्याचे काम सुरू केले आहे. गुगल प्लसच्या वापरकर्त्यांना आपली माहिती साठवून ठेवायची नसेल त्यांनी आपले अकौंट नष्ट करावे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. गुगल प्लस वरील सर्वच माहिती साठवून ठेवण्यात येणार नाही. तसेच कोणतीही खासगी पोस्ट आणि नष्ट केलेली गोपनीय माहिती साठवली जाणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केली आहे.