Share Market 12 April: चौफेर विक्रीमुळे आज 12 एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. जागतिक बाजारातून मिळालेल्या कमजोर संकेतांमुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुली केली. सेन्सेक्स जवळपास 793 अंकांनी घसरला. तर निफ्टी 234 अंकांनी घसरला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती आज 2.42 लाख कोटी रुपयांनी घटली.
घट होण्याचे एक कारण म्हणजे गुंतवणूकदार कंपन्यांच्या तिमाही निकालांची वाट पाहत होते. टीसीएससह अनेक कंपन्या त्यांचे निकाल जाहीर करणार आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही अर्ध्या टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज लाल रंगात बंद झाले.
व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 793.25 अंकांनी किंवा 1.06% घसरून 74,244.90 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 238.10 अंकांनी किंवा 1.05% घसरून 22,515.70 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे 2.42 लाख कोटी रुपयांचे नुकसान –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 12 एप्रिल रोजी 399.77 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 10 एप्रिल रोजी 402.19 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.42 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.42 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 3 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 0.67 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर टाटा स्टील (TCS) 0.45 % आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स 0.37% वाढले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
तर सेन्सेक्समधील उर्वरित 27 समभाग आज घसरणीसह बंद झाले. त्यातही सन फार्माचे शेअर्स 4.01 टक्क्यांनी घसरले. तर मारुती सुझुकी 3.17 %, पॉवर ग्रिड 2.57%, टायटन 2.40% आणि JSW स्टीलचे शेअर्स 2.22% घसरणीसह लाल रंगात बंद झाले.
2,367 समभाग घसरले –
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज, शेअर्सची संख्या वाढीच्या तुलनेत घसरणीसह बंद झाली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 3,943 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 1,477 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,367 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 99 समभाग कोणतेही चढउतार न होता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 189 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 12 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांक गाठला.