शरद पवार – सोनिया गांधी भेट

नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाविषयी त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

विधानसभा निवडणुकीला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे सामोरे जाणार आहेत. जागावाटप निश्‍चित करण्याच्या उद्देशातून त्या पक्षांच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये बैठकांचे सत्रही आधीपासूनच सुरू झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, पवार जागावाटपाच्या सुत्राला अंतिम रूप देण्याच्या उद्देशातून सोनियांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले.

त्यांच्यातील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांना मोठी गळती लागली आहे. त्या पक्षांचे अनेक नेते भाजप आणि शिवसेना या सत्तारूढ पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातून विरोधकांची ताकद घटत असल्याचे तर सत्ताधाऱ्यांचे बळ वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्याचे मोठेच आव्हान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आहे. त्यातून जागावाटपावरून त्यांच्यात फार ताणाताणी होणार नसल्याचे मानले जाते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×