Sharad Pawar On Navneet Kaur Rana : देशात आगामी लोकसभा निवडणूका पार पडणार आहे . त्यानुसार प्रत्येक पक्ष आपापल्या परीने जोरदार प्रचार करत आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती आणि प्रचाराची तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे. अश्यातच आता अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, यशोमती ठाकूर आदी दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत टीका केली. । Sharad Pawar On Navneet Kaur Rana
भाषणात त्यांनी अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यावर नाव न घेता टीका केली. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी आपली चूक झाली, असं थेट विधान केलं आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, खासदार केलं.
पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. की कधी तरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही. । Sharad Pawar On Navneet Kaur Rana
ती चूक आता दुरुस्त करायची आहे. ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सार्वजिनक आणि व्यक्तिगत जीवन स्वच्छ आहे. अशा बळवंतराव वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असे शरद पवार अमरावतीत म्हणाले.
यावेळी बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. “देशातली सत्ता मोदींच्या हातात आहे. गेली १० वर्षं आपण बघतोय. अनेक ठिकाणची त्यांची भाषणं ऐकतोय. काय सांगतात ते हल्ली?” असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.