IPL 2024 Virat Kohli No-ball Controversy : आयपीएलच्या 36व्या सामन्यात ‘एका आउटमुळे’ आता सर्वत्र वादाचे स्वरूप आले आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एका अशा चेंडूवर बाद देण्यात आले की, त्यानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट विश्वात खळबळ उडाली.
जाणून घ्या, काय आहे प्रकरण…
अलीकडेच, विराट कोहली आयपीएलच्या सामन्यात बाद झाल्यावर बराच गदारोळ झाला होता. वास्तविक, कोहलीला एका चेंडूवर आऊट देण्यात आले, जो कंबरेच्या वर फेकलेला धोकादायक चेंडू होता. पण तो खरोखर नो-बॉल होता का?
कोलकाताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने कोहलीला फुल टॉस बॉल टाकला. कोहलीने खेळपट्टीवर थोड पुढे येत चेंडू मारला आणि तो झेलबाद झाला. अंपायरने त्याला बाद घोषित केले. कोहलीने रिव्ह्यू घेतला तरी निर्णय बदलला नाही. मात्र, कोहलीला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचे अनेकांना वाटत होते. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोहलीने रिव्ह्यू घेतला तेव्हा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला.
मग कोहलीला बाद का घोषित करण्यात आले?
जर गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाच्या कमरेच्या वर गेला आणि फलंदाज स्ट्राइकवर उभा असेल तर तो नो-बॉल मानला जातो. पण कोहलीच्या बाबतीत असे झाले नाही.
Virat was indeed out as per the official rule book. The rule states that for a delivery to be considered a no ball, the ball must be at waist height as it crosses the stepping crease.
In Kohli’s situation, while the ball was at waist height when he encountered it, as it crossed… pic.twitter.com/RHLHZpnnTg
— Star Sports (@StarSportsIndia) April 21, 2024
तंत्रज्ञानानुसार राणाचा चेंडू योग्य होता कारण कोहली क्रीजच्या बाहेर उभा होता. चेंडू आणि बॅटची टक्करही शरीराच्या खूप पुढे झाली. तंत्रज्ञानाने हे देखील उघड केले की जर कोहली क्रीजच्या आत असता तर चेंडू त्याच्या कमरेपासून 0.92 मीटर उंचीवर आला असता. कोहलीच्या कमरेची उंची 1.04 मीटर आहे. त्यानुसार हा चेंडू नो-बॉल मानता येत नव्हता.
आयसीसीचा नियम काय सागंतो..?
ICC नियम 41.7 नुसार, जर गोलंदाजाने फलंदाजाच्या कंबरेच्या वर थेट चेंडू टाकला, जो खेळपट्टीवर न पडता टाकला जातो, तर तो नो-बॉल मानला जाईल. पण, या प्रकरणात हा नियम कोहलीच्या बाजूने गेला नाही.
हा नियम फलंदाजाच्या सुरक्षेसाठी करण्यात आला आहे. चेंडूमुळे फलंदाजाला दुखापत झाली नसली तरीही हा चेंडू नो बॉल म्हणून गणला जाईल.