पुणे – भीमथडी जत्रेस मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची सदिच्छा भेट.यावेळी भीमथडी जत्रेत अनेक महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या स्टॉल ला भेट दिली.
यावेळी त्यांनी अनेक महिलांशी व्यावसायिक संवाद साधला, यावेळी मा.साहेबांचे अनेक महिला बचत गट आणि शेतकरी यांनी औक्षण केले.भीमथडी जत्रेला मागील तीन वर्षांपासून भेट देत असून मला प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण बदल आणि सुधारणा झाल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विचार व्यक्त केले.पत्रकारांनी विचारलेल्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
ग्राहकांनी भीमथडी ही जत्रा पुण्यात होतीय याचा फायदा अनेक महिला बचत गटांना होतोय तसाच फायदा मुंबई मधील आणि परिसरातील बचत गटांना व्हावा याकरिता अशीच भीमथडी जत्रा मुंबई या ठिकाणी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली असता मा.पवार साहेब यांनी कोणताही विचार न करता आपला होकार व्यक्त करत आयोजक म्हणून सुनंदा पवार तयार असतील तर मी निश्चित त्यांना जागा उपलब्ध करण्यास मदत करेन,असे आवाहन केले.
यावेळी ग्रामीण कलाकार आणि कारागीर यांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी पुणेकर ग्राहक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी मल्लखांब सादर केले. तर, बिरुदेव तरुण मंडळ दुधेभावे फलटण यांनी सादर केलेले गजी नृत्य यावेळचे मुख्य आकर्षण ठरले.