पुणे – ॲग्रीकल्चरल डेव्ललपमेंट ट्रस्ट, बारामती,महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सामाजिक संस्था मदतीतून आयोजित 14 व्या भीमथडी जत्रेस पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. असल्याची माहिती आयोजक सौ.सुनंदाताई पवार यांनी दिली.
वेगवेगळ्या भागात सामाजिक हेतूने महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था, ग्रामीण भागातील गरजू,गरीब बचत गटांना संधी देत,अपंग व नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या कलाकारांना घेऊन ही भीमथडी जत्रा संपन्न झाली.
पारंपारिक कला आणि कलाकार यांचा सहभाग , हस्तकला वस्तू,कपडे, ग्रामीण शाकाहारी,मांसाहारी खाद्य महोत्सव,ग्रामीण महिलांनी बनविलेले उत्तम प्रतीचे उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले,लोणची आशा अनेक वस्तूंचे बचत गट यावेळी सहभागी झाले होते.
या प्रदर्शनास मा.शरदचंद्रजी पवार साहेब मा.कृषिमंत्री भारत सरकार,मा.खा.सुप्रियाताई सुळे,आमदार रोहित पवार,चेअरमन मा.राजेंद्र पवार , के.पी.विश्वनाथा,कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ, प्रमोद रसाळ सहयोगी अधिष्ठाता महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी,पदाधिकारी, सिनेकलावंत सामाजिक संस्था व पुणेकरांनी यांनी भरघोस प्रतिसाद दिला.यावर्षी भीमथडी जत्रेत एकूण स्टॉल 331 एकूण सहभागी महिला बचत गट 348 एकूण ग्राहक भेट 85 हजार याशिवाय महिला बचत गट यांचा सहभाग,यावर्षी सहभागी महिला बचत गट उत्पादनाची 2 कोटी 13 लाख आर्थिक उलाढाल नेहमी जत्रेत येणाऱ्या पुणेकरांसह प्रथमच जत्रेस येणाऱ्या हजारो पुणेकरांचा यंदा वाढता प्रतिसाद पाहायला मिळाला आहे.अफगाणिस्थान या देशातील महिला उद्योजक यांचा प्रातिनिधिक सहभाग तसेच भारत देशातील 14 राज्य आणि महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील महिला बचत गट यांचा सहभाग असणारी भीमथडी यंदा नव्या स्वरूपात पाहायला मिळाली आहे.
महाराष्ट्राची संस्कृती म्हणून जगभर पंढरपूरची वारी प्रसिद्ध आहे आणि या संस्कृतीचे संवर्धन म्हणून भीमथडी जत्रेमध्ये वारीच्या संकल्पनेचा विचार करण्यात आला होता. निष्ठा, सेवा, श्रद्धा, कला, संस्कृती आणि अध्यात्म याचे दर्शन व्हावे या उद्देशाने पंढरीच्या वारीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
रात्री करमणूक म्हणून हिंदुस्थानी/सूफी संगीत, ढोल-ताशाच्या तालात मराठी गाण्याचा कार्यक्रम याशिवाय करमणुकीचे कार्यक्रमांचे आयोजन,ग्रामीण कलाकार पोतराज,गोंधळी,धनगरी नृत्य,बारा बलुतेदार,नंदीबैल, बुरुड,पाथरवट,केरसोनीवाला,भारुड अशा अनेक ग्रामीण कलाकारांनी आपली कला सादर करत पुणेकरांचा प्रतिसाद मिळवला.