नेवासा (राजेंद्र वाघमारे) – राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड राजकिय उलथापालथ होवून आता थेट ठाकरे सरकार बदलून मुख्यमंञीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस पदावर विराजमान झाले. या राजकीय घडामोडींमुळे शिवसेना पक्षाला सध्या तरी उतरतीकळा लागल्याचं दिसतंय. शिवसेनेच्या मंञ्यांसह आमदारही आता धनुष्यबाणाला बाय..बाय..करत पुन्हा भाजपाची अन् पर्यायाने सत्तेची आस.. धरतांना दिसू लागले आहेत.
स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकरराव गडाख यांनी विधानसभा निडणुकीत विजयी झाल्यानंतर शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देवून शिवसेनेच्या कोट्यातील मृद व जलसंधारणमंञीपद पदरात पडून घेतले होते. महाविकास आघाडी सरकारच्या मंञीमंडळात राज्याचे कॅबिनेट मंञीपदाची धुरा संभाळणाऱे माजी मंञी शंकरराव गडाख यांनी सोमवारी सकाळी १० वाजता कार्यकर्त्यांना ‘मला आपणाशी बोलायच’ आहे असे म्हणून सोनई गावांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर टीकास्त्र; म्हणाले, अडीच वर्षात…
यावेळी गडाख आपली राजकिय भूमिका स्पष्ट करणार असल्याने ते कार्यकर्त्यांच्या बैठकित शिवसेनेला बाय…बाय… करणार की, काय अशी जोरदार चर्चा नेवासा तालुक्यात सुरु झाली आहे. गडाख या मेळाव्यात नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे आता तालुक्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या निधी वाटपात आपल्या मतदार संघाच्या वाट्याला मोठा निधी मिळत नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांचे ऐकूण घेत नाहीत, मातोश्रीवर थांबूनही भेट मिळत नसल्याचे कारणे सांगून राज्यातील शिवसेनेच्या आमदारांनी मंञी एकनाथ शिंदेच्या नेत्तृत्वाखाली बंड करुन महाविकास आघाडी सरकारच थेट उलथवून टाकत सत्तेचा सारिपाट बदलून टाकला.
सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिशीला नरहरी झिरवाळ यांचे उत्तर; बंडखोर 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई…
राज्याच्या मुख्यमंञीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस विराजमान झालेले आहेत. नवे गडी नविन राज निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक आमदार खासदार शिंदे सरकारच्या संपर्कात असल्यामुळे आता नेवाशाचे आमदार शंकरराव गडाखही कार्यकर्त्यांशी काय संवाद साधणार? शिवसेनेला बाय…बाय…करणार का ? या चर्चेला तालुक्यात उधाण आलेले असून गडाखांच्या भूमिकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
…तर आम्ही मातोश्रीवर जाण्यास तयार, शिंदे गटातील आमदाराचे विधान