मुंबई – सध्या रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ऍनिमल चांगलाच चर्चेत आहे. मोठी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर देखील लॉंच करण्यात आलं होत. ज्यामध्ये रणबीर कपूरचा खुंखार लूक पाहायला मिळाला होता. वाढलेले कैसे हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड असा पोस्टरमधील रणबीरचा लूक पाहून चित्रपटाची उत्कंठा चांगलीच वाढली होती. आता या चित्रपटात बड्या स्टारची एंट्री होणार आहे.
बॉलिवूडमध्ये कॉमेडीसह खतरनाक व्हीलनची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता शक्ती कपूर देखील ऍनिमलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात शक्ती एका जबरदस्त व्हिलनची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, बाबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी देखील दिसणार आहेत. अशात शक्ती कपूरची एंट्री होणार असल्याने पुन्हा एकदा खलनायक पाहायला मजा येणार आहे.
ऍनिमल हा संदीप वंगा रेड्डी दिग्दर्शित चित्रपट आहे. ऍनिमल एका गँगस्टर कुटुंबाची कथा सांगतो, ज्यामध्ये अनिल कपूर वडिलांची भूमिका करत आहे आणि रणबीर कपूर मुलाची भूमिका साकारणार आहे. बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल फारशी माहिती समोर आलेली नसली तरी तो देखील निगेटिव्ह रोलमध्ये दिसणार आहे.
हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यासोबत सनी देओलचा गदर 2 देखील रिलीज होणार आहे. अशा परिस्थितीत एकाच वेळी दोन बड्या स्टार्सचे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत असल्यामुळे प्रेक्षकांना दमदार ऍक्शन पाहायला मिळणार आहे.