मुंबई – रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने अनेकांचे नशीब उजळले. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे बॉबी देओलने प्रदीर्घ काळानंतर बॉलीवूडमध्ये जोरदार पुनरागमन केले, तर रणबीर कपूरसाठी ‘अॅनिमल’ हा त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. सध्या या चित्रपटातील जमाल कुडू या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. या गाण्यामध्ये असलेल्या साईड अभिनेत्रीचे इंस्टाग्राम प्रोफाइल चांगलेच चर्चेत आले आहे.
जमाल कुडू या गाण्याला YOUTUBE वर दमदार व्ह्यूज मिळाले आहेत.या व्हिडिओला 61 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळत आहेत. ‘जमाल कुडू’ गाणे रिलीज झाल्यानंतर चांगलंच व्हायरल झालं. आणि व्हायरल झाली या गाण्यामध्ये बॉबी देओलच्या बॅग्राऊंड असलेली अभिनेत्री. या अभिनेत्रीची नाव आहे तन्नाज दावूदी.
‘जमाल कुडू’ या गाण्यावर चाहते खूप रिल्स करत आहेत. या गाण्यातील बॉबी देओलच्या स्टेप्स व्हायरल होत असताना, बॅकग्राउंडमध्ये एका ग्रुपसोबत उभं राहून इराणी भाषेत ‘जमाल कुडू’ गाणाऱ्या तन्नाज दावूदीनेही तिच्या सौंदर्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.तन्नाज गेल्या काही काळापासून बॉलीवूडमध्ये असली तरी या गाण्याने ती सोशल मीडियावर रातोरात स्टार बनली आहे.
जमाल कुडू व्हायरल होण्यापूर्वी या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर सुमारे 10 हजार फॉलोअर्स होते, परंतु हे गाणे लोकप्रिय होताच भारतात तन्नाज दाऊदीला शोधणाऱ्यांची संख्या वाढली. आता तिच्या इंस्टाग्रामवर सुमारे २.७१ लाख फॉलोअर्स झाले आहेत. तृप्तीशिवाय अनेक चाहते तिला नवीन राष्ट्रीय क्रश म्हणून संबोधत आहेत.
तन्नाज दावूदी मूळची इराणी
जमाल कुडू या गाण्यात दिसणारी तन्नाज दावूदी ही इराणची आहे. ती व्यवसायाने मॉडेल आणि डान्सर आहे. जमाल कुडू गाण्याची संधी मिळण्यापूर्वी तिने वरुण धवनपासून नोरा फतेही, जॉन अब्राहम आणि सनी लिओनपर्यंत सर्वांसोबत काम केले आहे.मात्र, पार्श्व अभिनेत्री असल्यामुळे चाहत्यांनी तिची फारशी दखल घेतली नाही. जमाल कुडू या गाण्यातून तिला पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात येण्याची संधी मिळाली. ‘जमाल कुडू’ हे गाणे मुळात इराणी भाषेत 1950 मध्ये गायले गेले होते. हे लग्नाचे गाणे आहे.