मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ (Animal Movie) हा 2023 चा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. कबीर सिंग फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandip reddy wanga) यांच्या आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, नुकतेच रणबीर कपूरने या चित्रपटाचे नाव ‘अॅनिमल’ का ठेवले आहे याबाबत खुलासा केला आहे.(Ranbir kapooor)
नुकतीच ‘अॅनिमल’ची टीम चेन्नईमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. कार्यक्रमादरम्यान, अनेक प्रश्नांदरम्यान, रणबीरला ‘अॅनिमल’ या चित्रपटाचे नाव देण्यामागचे कारण विचारण्यात आले. तर अभिनेता म्हणाला की प्राणी कोणताही कसलाही विचार न करता वागतात ते आजिबात विचारपूर्वक वागत नाहीत.म्हणूनच या चित्रपटाचे नाव ‘अॅनिमल’ठेवण्यात आले आहे.(Ranbir rashmika)
रणबीर पुढे म्हणतो की, या चित्रपटातील त्याची व्यक्तिरेखा देखील एखाद्या प्राण्यासारखी आहे जो आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी सहजतेने वागतो. तो कोणताही विचार करत नाही की तो नेमका कसा वागत आहे. तो अविचारी आहे. त्यामुळेच या चित्रपटाचे नाव ‘अॅनिमल’ ठेवण्यात आले. रणबीरने असेही सांगितले की, तुम्ही एकदा हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट नावाशी जुळतो हे लक्षात येईल. (Animal Full Movie )
‘अॅनिमल’मध्ये दिसणार हे स्टार्स
रणबीर कपूर व्यतिरिक्त बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय, प्रेम चोप्रा आणि तृप्ती डिमरी देखील ‘अॅनिमल’ मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे, जो ‘कबीर सिंग’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ दिग्दर्शित करण्यासाठी ओळखला जातो. भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांची टी-सीरीज, मुराद खेतानी यांच्या सिने १ स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स निर्मित, ‘अॅनिमल’ 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.