मुंबई – सेलिब्रिटींना त्यांच्या चाहत्यांकडून त्रास दिल्याच्या आणि संमतीशिवाय त्यांची प्रायव्हसीचे उल्लंघन केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेकदा स्टार्स पुढे येतात आणि चाहत्यांकडून केल्या जाणाऱ्या कृत्यांबद्दल तक्रार करतात. चाहत्याकडून गैर कृती करण्याचा असाच एक प्रसंग अभिनेता रणबीर कपूरसोबत नुकताच घडला.यानंतर रणबीर फॅन सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
काही महिन्यांपूर्वी आलिया भट्टने तिच्या आणि मुलगी राहा यांच्या संमतीशिवाय फोटो काढल्याने आक्षेप घेत चाहत्यांसह पापाराझींना फटकारले होते, आता अभिनेत्रीचा पती रणबीर कपूरसोबतही अशीच घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती रणबीरच्या कारचा पाठलाग करताना आणि त्याने नकार देऊनही आतमध्ये त्याचे फोटो क्लिक करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हेल्मेटशिवाय बाईक चालवताना आणि रणबीरच्या कारचा पाठलाग करताना दिसत आहे. कारमध्ये बसलेल्या अभिनेत्याचा स्पष्ट फोटो मिळविण्यासाठी ती व्यक्ती आपला फोन कारच्या खिडकीला चिकटवते. त्यानंतर रणबीरच्या ड्रायव्हरने त्याचा आरसा खाली केला आणि त्या माणसाला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या ही व्यक्ती ऐकायला तयार नव्हती. जीवावर बेतेल अशा पद्धतीने चालू दुचाकीवरून ही व्यक्ती फोटो काढण्याचा प्रयत्न करते. यानंतर स्लो चाललेल्या रणबीरच्या कार समोरून दुचाकी आडवी करून पुढे जाते.
View this post on Instagram
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमुळे रणबीर फॅन्स चांगलेच भडकले आहेत. चाहत्यांनी अशा प्रकारे स्वतःच्या जीवावर बेतेल असे काम करू नये अशा कमेंट अनेकांनी या व्हिडिओवर पोस्ट केल्या आहेत. तर काहींनी रणबीरने त्याला फोटो क्लिक करू द्यायला पाहिजे होता असं म्हंटल आहे. रणबीर कपूर त्याचा आगामी चित्रपट ‘अॅनिमल’ च्या रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात रणबीर यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. हा चित्रपट 11 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.