मुंबई – शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे त्यांची मुलगी सुहाना खानही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना पदार्पणापूर्वीच सोशल मीडिया स्टार बनली आहे. सुहाना जिथे जाते तिथे मीडिया तिला कॅमेऱ्यात कैद करतो. दरम्यान, तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
नुकतीच सुहाना खान विमानतळावर स्पॉट झाली आहे. यादरम्यान तिचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुहाना बिना मेकअप प्रवास करत असल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओमध्ये सुहाना खानने ग्रे रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग पँट घातली आहे. त्यासोबाबत तिने आपले केस मोकळे सोडल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. सुहाना झिरो मेकअपमध्ये असल्यामुळे तिच्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
चाहत्यांना मात्र सुहानाचा हा नो मेकअप लूक तितकासा आवडताना दिसत नाही. ‘मेकअप शिवाय खूप वाईट दिसते अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने ही शाहरुखची मुलगी नसती तर ? असा सवाल व्हिडीओ काढणाऱ्या मीडियासमोर उपस्थित केला आहे. सुहाना खान लवकरच झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची देखील चर्चा आहे.