मुंबई – बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणजेच, ‘राखी सावंत’ला कोण ओळखत नाही राखी अनेकदा तिच्या फ्लर्टीशियल, बोल्ड स्टाइल आणि अॅटिट्यूडमुळे चर्चेत असते, पण यावेळी राखी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. राखी सावंत हिला प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राचे प्रायव्हेट फोटो व्हायरल केल्या प्रकणी अटक करण्यात आली आहे.
स्वतः शर्लिन चोप्राने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. या ट्विटमध्ये शर्लिनने एफआयआरविषयीही माहिती दिली आहे. त्यामुळे आता अंबोली पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत राखी सावंतला अटक केलीय. पोलिसांनी एफआयआर 883/2022 संबंधी राखी सावंतला अटक केली आहे. सध्या शर्लिन चोप्राचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
अंबोली पुलिस ने FIR 883/2022 के संबंध में राखी सावंत को गिरफ़्तार किया।
कल राखी सावंत की ABA 1870/2022 को मुंबई सत्र न्यायालय ने खारिज कर दिया था। @aajtak @ZeeNews @News18India @NewsNationTV @TNNavbharat @TOIIndiaNews @ANI
— Sherlyn Chopra (शर्लिन चोपड़ा)🇮🇳 (@SherlynChopra) January 19, 2023
कोण आहे? शर्लिन चोप्रा…
शर्लिन चोप्रा ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे. 2012 मध्ये तिने ‘प्लेबॉय’ मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याच्या दोन वर्षांनंतर तिचे हे फोटो समोर आले होते. एमटीव्ही स्पिल्ट्सविलाच्या सहाव्या सिझनचं तिने सूत्रसंचालन केलं. तिने बिग बॉसमध्येही भाग घेतला होता. तेव्हा पासून शर्लिन चर्चेत आली आहे. इंस्टाग्रामवर देखील अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राचे लाखोंच्या घरात फॉलोवर्स असून, फॅन्स देखील तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडत असतात.