शाहरुख खानला सामाजिक जबाबदारीचे भान

दीपिका पादुकोणने आपल्या आगामी “छपाक’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपट ऍसिड हल्ला झालेल्या लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यातच आता दीपिकाच्या अगोदरपासूनच को-स्टार शाहरुख खानही ऍसिड हल्ला पिडितांनी मदत करत आहे. त्याने आपल्या एनजीओच्या मदतीने जागतिक महिला दिनानिमित्त 50 बर्न आणि ऍसिड हल्ला झालेल्यांची सर्जरी केली आहे.

या सर्जरी दिल्ली आणि वाराणसी येथील रुग्णालयात करण्यात आल्या. शाहरुखच्या फाउंडेशनकडून लवकरच आणखीन 40 ते 50 सर्जरी करण्यात येणार आहेत. गतवर्षी शाहरुखला ऍसिड हल्ला पिडितांना मदतकार्य केल्याबद्‌दल वर्ल्ड इकॉनमिक फोरम-2018 दावोस येथे क्रिस्टल अवॉर्डने सम्मानित करण्यात आले होते.

याबाबत खुद्‌द शाहरुख खान म्हणाला होता की, आम्ही गेल्या काही वर्षांपासून या पिडितांना प्रोत्साही देण्यासाठी विशेष काम करत आहे. मला आशा आहे की, आणखीनही काही जण पुढाकार घेवून यासारखे हल्ले रोखण्यासाठी मदत करतील. दरम्यान, मीर फाउंडेशनकडून ऍसिड हल्ल्यातील पिडितांना सर्वातोपरी मदत करण्यात येते. ज्यामुळे त्यांना आपले पुढील आयुष्य उत्तमरित्या जगता यावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.