बॉलीवूडमधील सेलिब्रेटीजना आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया हे सर्वांत लोकप्रिय साधन आहे. सिलेब्रिटीज आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटवर फोटोज् आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. पण कधी-कधी हे त्यांच्यासाठी त्रासदायकही ठरत आहे. अनेकवेळा त्यांना आपल्या फोटोमुळे ट्रोलर्सचा सामनाही करावा लागत असतो. असेच काही अनुष्का शर्मासोबत झाले आहे.
त्याचे झाले असे की, अनुष्मा शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. यात तिने एक स्टाइलिश ड्रेस परिधान केलेला होता. हा फोटो पोस्ट करताच काही जणांनी तिची तुलना थेट रणवीर सिंहसोबत केली. हा ड्रेस चाहत्यांना पचणी पडला नाही. त्यामुळे काही जणांनी स्तुती केली, तर काही जणांनी तिला “फीमेल रणवीर सिंह’ असे म्हटले. फोटोवरील प्रत्येक तिस-या कॉमेंटमध्ये रणवीर सिंहचा उल्लेख होता.
दरम्यान, हा फोटो दीपिका पादुकोणलाही आवडला. दीपिकाने अनुष्काच्या फोटोवर कॉमेंट करत लिहिले की, सो गुड! त्यावर अनुष्कानेही रिप्लाय दिला.