मुंबई – फर्जी या सिरीजमधून ओटीटीवर पदार्पण करणारा अभिनेता शाहिद कपूर आता त्याच्या आगामी चित्रपट ब्लडी डॅडीच्या रिलीजसाठी सज्ज झाला आहे. एप्रिलमध्येच शाहिदने ब्लडी डॅडीचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आणला होता. जो पाहून चाहते खूप उत्साहित झाले होते. मात्र शाहिदच्या या नव्या अंदाजावरून बॉलिवूड क्रिटिक आणि अभिनेता कमल आर खान चांगलाच संतापला आहे.
केआरके स्वतःला चित्रपट समीक्षक म्हणून घेतो आणि अनेकदा बॉलिवूडमधील कलाकारांवर आपले रोखठोक मत व्यक्त करत असतो. केआरकेने एक ट्विट करत शाहिदच्या आगामी प्रोजेक्टबाबत भाष्य केलं आहे. ट्विटमध्ये केआरके म्हणतो,”शाहिद कपूरचा नवीन चित्रपट ब्लडी डॅडी जिओ सिनेमावर फ्रीमध्ये प्रदर्शित होणार आहे. मग आता त्याचा कोणताही चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यासाठी लोक तिकिटे का काढतील? त्यामुळे शाहिदचे करिअर पूर्णपणे संपले आहे, असा माझा विश्वास आहे. त्याच्या पुढच्या चित्रपटाला थिएटरमध्येही 1 कोटींची ओपनिंग देखील मिळणार नाही”
शाहिदने बऱ्याच कालावधीनंतर ‘फर्जी’ ही हिट कलाकृती दिली. त्यानंतर आता ‘ब्लडी डॅडी’मध्ये देखील तो आगळीवेगळी भूमिका साकारत आहे. ब्लडी डॅडीच्या ट्रेलर लॉँचवेळी शाहिद कपूरने चित्रपटातील अॅक्शन सीक्वेन्सबद्दल सांगितले. शाहीद म्हणाला, “चित्रपटातील अॅक्शन अतिशय जबरदस्त, कडक आणि युनिक आहे.
Shahid Kapoor’s new film #BloodyDaddy is going to be stream free on #JioCinema! Then why people will buy tickets to watch his any film in the theatre? So I believe that Shahid’s career is totally finished. His next film won’t get opening of ₹1Cr also in the theatres.
— KRK (@kamaalrkhan) May 24, 2023
अली अब्बास जफर दिग्दर्शित ब्लडी डॅडीमध्ये शाहिद कपूर, रोनित बोस रॉय, डायना पेंटी, संजय कपूर, राजीव खंडेलवाल, अंकुर भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 9 जून 2023 रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.