मुंबई – अभिनेता शाहिद कपूरने कबीर सिंग, जब वी मेट यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. आपल्या अभियनासह उत्तम डान्ससाठी देखील तो ओळखला जातो. मात्र नेहमी शांत असणारा शाहिद एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळाला. शाहिद पत्नी मीरा राजपूतसोबत अनेक ठिकाणी स्पॉट होतो. तो पापाराझींना फोटोसाठी पोझ देताना दिसतो. परंतु एका कार्यक्रमादरम्यान पोझसाठी उभे राहिल्यानंतर शाहिद पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूत आणि कुटुंबासोबत 2 सप्टेंबरला मुंबईत भाऊ रुहान कपूरच्या लग्नासाठी गेले होते. त्यावेळी मीडिया देखील बाहेर उपस्थित होते. मात्र तेव्हा पोझसाठी पापाराझी मोठ्याने त्याला हाक मारू लागले. यामुळे शाहिद चांगलाच संतापला. पापाराझींनी गोंधळ घातल्यानंतर शाहिदने त्यांना सुनावले. शाहिद त्यांना म्हणाला, ‘इथेच उभे आहोत आम्ही, कशाला ओरडताय? जेव्हा आम्ही येथून जाऊ तेव्हा आरडाओरडा करा.’
शाहिदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे. ‘शाहिदने जे केलं ते बरोबर होत’, ‘त्यांना देखील स्पेस देण्याची गरज आहे’, असे एका नेटकऱ्याने म्हंटले आहे. तर काहींनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. ‘इतका अॅटीट्यूड का दाखवतात?’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, शाहिद कपूरच्या ‘उडता पंजाब’, ‘हैदर’, ‘जब वी मेट’, ‘पद्मावत’ आणि ‘इश्क विश्क’ सारख्या अनेक चित्रपटांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो क्रिती सेननसोबत नव्या चित्रपटात झळकणार आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.