मुंबई – शाहिद कपूर स्टारर ‘जर्सी’ आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचा पहिला ट्रेलर आला होता तेव्हापासून चाहत्यांना शाहिद कपूरला पाहण्याची इच्छा आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता तीन वर्षांनी पडद्यावर परतणार आहे. गुरुवारी म्हणजेच काल, चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्टार्सनी सजवलेल्या स्क्रीनिंगचे आयोजन केले होते, या स्क्रीनिंगला अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. ज्यामध्ये अभिनेत्री कियारा अडवाणीचाही समावेश होता.
कियाराने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटासाठी शाहिदला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटाबद्दल तिचे विचार व्यक्त केले. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अभिनेत्री म्हणाली की, ”माझ्या प्रिय एस.के., तू खूप खास आहेस, तुला अर्जुनच्या रूपात पाहणे जादूपेक्षा कमी नाही. उद्या जर्सी रिलीज होत आहे. माझ्याकडून संपूर्ण टीमला शुभेच्छा.”
कियाराच्या या पोस्टवर शाहिदने खास रिप्लाय दिला. 2019 च्या त्याच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातून ‘प्रीती’ आणि स्वतःला ‘कबीर’ म्हणून संबोधत करत अभिनेत्याचे लिहिले, ‘माझी प्रिय प्रीती, तुझे शब्द सदैव कबीरच्या हृदयात असतील, ‘तू मेरी बंदी है’. असा हटके रिप्लाय दिला आहे. या दोघांचा 2019 मध्ये आलेल्या कबीर सिंग चित्रपटातील हा प्रसिद्ध डायलॉग आहे. या चित्रपटातील शाहिद आणि कियाराची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. दरम्यान, शाहिदचा हा रिप्लाय बघून शाहिद आणखी कोणाच्या प्रेमात पडला की काय अशा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता.