मुंबई – बॉलीवूडमध्ये अभिनेत्री कतरिना कैफने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. कतरिना सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. कतरिना तिच्या बोल्ड स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
View this post on Instagram
नुकतंच कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये ती खूपच मादक दिसत आहे. फोटोंमध्ये कतरिना कैफने तिच्या व्हाईट कलरच्या स्वेट शर्टमध्ये सुंदर फोटो पोस्ट केले आहे. पांढऱ्या रंगाच्या स्वेट शर्टमध्ये कतरिना कैफ किलर पोज देताना दिसत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीच्या मोहक हास्याने तिच्यात सौंदर्यात आणखीन भर टाकली आहे.विकी कौशलसोबत लग्नानंतर कतरिना सतत आपले रोमँटिक फोटोसुद्धा शेअर करत असते. तिच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, मेरी ख्रिसमस, टायगर 3, फोन भूत, जी ले जरा या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.