झिरो फ्लॉप झाल्यापासून शाहरुखने काही काळासाठी सिनेसृष्टीमधून ब्रेक घेतला होता. त्याने नवीन सिनेमा घेतलेला नाही आणि त्याच्याकडील सिनेमांच्या यादीवर त्याने अद्याप काही निर्णयही घेतलेला नाही. पण त्याने आता एका सामाजिक प्रश्नावरच्या सत्यकथेवर सिनेमाची निर्मिती करायचे ठरवले आहे. बिहारमधील मुझफ्फरनगर शेल्टर होम रेप प्रकरणावर शाहरुख खानने सिनेमा करण्याचे ठरवले आहे.
या शेल्टर होममध्ये राहणाऱ्या काही अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सने एक अहवाल तयार केला होता. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय पातळीवर गाजले होते. शाहरुख खानने हा विषय सिनेमासाठी निवडला आहे.
सुभाषचंद्र बोस आणि 2017 मध्ये आलेला मरून या सिनेमांचे डायरेक्शन करणाऱ्या पुलकितकडे शाहरुखच्या या सिनेमाच्या डायरेक्शनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुलकितने या विषयावरचे संशोधन केले आहे. हे प्रकरण शोधून काढणाऱ्या हिरोला पत्रकारच्या भूमिकेत दाखवले जाणार आहे.
या सिनेमाचे शूटिंग जुलैमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. लवकरच या सिनेमातील कलाकारांची नावे समजतील. शाहरुखने निर्मिती केलेला कामयाब अलीकडेच रिलीज झाला होता. त्यामध्ये संजय मिश्रा लीड रोलमध्ये होता.