शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेले नसले तरी तिचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढते आहे. सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असलेल्या सुहानाचे कितीतरी फॅन फॉलोअर आहेत.
इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सुहानाने सोशल मीडियावर आपले फोटो नेहमीच पोस्ट करत असते. चाहत्यांना तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षावदेखील करत असतात.
आज सुहानाचा वाढदिवस असून तिची आई गौरी खानने सोशल मीडियावर सुहानाचा एक सुंदर फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौरी खानने शेअर केलेल्या फोटोत सुहाना एका खुर्चीवर बसलेली दिसते आहे.
तिने पोलका डॉट ड्रेस परिधान केला आहे. फोटो शेअर करून गौरीने लिहिले की, तुझ्यावर आज..उद्या आणि कायमच प्रेम राहील. तर गौरीच्या या पोस्टवर सुहानाने देखील “आय लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे. गौरीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींना कमेंट करत सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.