मुंबई – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने बॉक्सऑफिसवर मोठी कमाई केली होती. त्यानंतर आता त्याच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘डॉन 3’ या चित्रपटाची घोषणा झाली होती. या चित्रपटात शाहरुख दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र या सिनेमात आता शाहरुख दिसणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
‘डॉन 3’च्या कथानकावर काम करायला सुरुवात झाली आहे. मात्र या सिनेमात शाहरुख काम करणार नाही. शाहरुखने नकार दिल्याने निर्मात्यांनी एका बड्या अभिनेत्याला या सिनेमासाठी विचारणा केली आहे. मात्र शाहरुखच्या जागी एका दर्जेदार अभिनेत्याला हा सिनेमा मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. आता कोणत्या अभिनेत्याला ही भूमिका मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लवकरच या सिनेमाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
पहिल्या दोन ‘डॉन’ आणि ‘डॉन 2’ या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच शाहरुख लवकरच मोठ्या पडद्यावर पुन्हा ‘डॉन’ ची भूमिका साकारताना दिसणार असल्याने चाहते देखील आनंदी झाले होते. मात्र आता शाहरुखने या चित्रपटातून एक्झिट घेतली आहे. शाहरुख खानला आता पुन्हा डॉन चित्रपट करण्यात काहीही रस नसल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखला काही व्यावसायिक चित्रपट करायचे आहेत. शाहरुख खानला पुढची काही वर्षे ज्या प्रकारचा सिनेमा करायचा आहे, त्याच्यात ‘डॉन 3’ बसत नसल्याने त्याने या सिनेमाला नकार दिला असल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, किंग खान लवकरच ‘जवान’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. दक्षिणेचे दिग्दर्शक अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा त्याच्यासोबत असणार आहे. तर साऊथ स्टार विजय सेतुपती या चित्रपटाचा खलनायक असणार आहे. त्याचबरोबर शाहरुख दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटातही काम करत आहे.