मुंबई – चेन्नई एक्स्प्रेसनंतर शाहरुखच्या कोणत्याही चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शाहरुखने काही काळ गॅप घेतला. नंतर त्याने विचारपूर्वक जो पहिला चित्रपट साइन केला त्याचे नाव आहे पठाण. पठाण शाहरुखची दुसरी इनिंग आहे असे मानायला हरकत नाही.
या चित्रपटात तुफान ऍक्शन असणार असल्याचे बोलले जाते. रॉया भारतीय गुप्तचर संस्थेच्या कारनाम्याशी संबंधित त्याची कथा असल्याची मध्यंतरी बातमी होती. त्याचवेळी यशराज फिल्मस्चा टायगर अर्थात सलमान खानचीही क्लायमॅक्सच्या सीन्ससाठी चित्रपटात एन्ट्री झाली.
चित्रपटात तो आल्यामुळे त्याच्यासाठी वेगळा तडकाही देण्यात आला. त्यामुळे ऍक्शनपॅक्ड मनोरंजनाची हमी पूर्ण असणार आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या एका पैलूबाबत फारशी चर्चा झालेली नाही.
ती म्हणजे जॉन अब्राहम या चित्रपटाचा खलनायक आहे. जॉन आला म्हणजे त्याच्या व्यक्तीत्वाला साजेशी ऍक्शनही द्यावी लागणार. त्याची अर्थातच चित्रपटाचा नायक शाहरुखशी टक्कर पाहायला मिळणार आहे.