बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज 2 नोव्हेंबरला त्याचा 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. किंग खानचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. अशात जगभरातील करोडो चाहते, कुटुंबीय आणि सेलेब्स सुपरस्टारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शाहरुख खानची लेक सुहानानेही तिच्या वडिलांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
#WATCH | Mumbai: Actor Shah Rukh Khan waves at the fans who gathered outside his residence ‘Mannat’ in large numbers to catch a glimpse of him, on Shah Rukh Khan’s 58th birthday.#ShahRukhKhan pic.twitter.com/gjE99qa0ZX
— ANI (@ANI) November 1, 2023
सुहाना खान तिचे वडील शाहरुख खानच्या खूप जवळ आहे. त्याच्या लेकीने तिच्या वडिलांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. सुहानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काही दुर्मिळ रेयर थ्रोबैक फोटो शेअर केले. पहिला फोटो आयपीएल सामन्यादरम्यान काढण्यात आला होता. फोटोमध्ये, छोटी सुहाना शाहरुख खानच्या गालावर किस करताना दिसत आहे. सुहानाने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा…!’
दुसऱ्या पोस्टमध्ये, सुहानाने तिचे वडील शाहरुख खान आणि मोठा भाऊ आर्यन खान यांच्यासोबतच्या काही जुन्या फोटोंचा मोनोक्रोम कोलाज अपलोड केला आहे. जेव्हा ते लहान होते. फोटोंमध्ये, शाहरुख आपल्या लहान मुलांसोबत पोज देण्याचा प्रयत्न करत आहे, तर ते त्यांच्या मस्करीवर हसत आहे. या सुंदर फोटोच्या कॅप्शनमध्ये सुहानाने लिहिले की, “लव्ह यू द मोस्ट”
दरम्यान दरवर्षी प्रमाणे शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मुंबईतील घराबाहेरही हजारो चाहते पोहोचले. यावेळी अनेक चाहत्यांनी किंग खानचे पोस्टर हातात घेतलेले दिसले तर अनेकांनी फटाके फोडून बॉलिवूडच्या बादशहाचा वाढदिवस साजरा केला. शाहरुख खाननेही मध्यरात्री त्याच्या घराच्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला. यावेळी किंग खान हात जोडून चाहत्यांचे आभार मानताना दिसला. आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी शाहरुखने हात पसरून त्याची आयकॉनिक पोजही दिली.