मुंबई – बॉलीवूडसह हॉलीवूडमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने यश मिळवले आहे. तिच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सोशल मीडियावर देखील प्रियांका सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा ती पती निकसोबत फोटो शेअर करताना दिसते. या दोघांची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत राहिली होती. अनेकदा निक प्रियांकासाठी पोस्ट शेअर करताना दिसून येतो. नुकतेच निक जोनसने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पत्नी प्रियांका चोप्राचा साडीतील फोटो पोस्ट केला.
निकने प्रियांकाचा हिरव्या साडीतील एक फोटो पोस्ट करत तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे. प्रियांकाच्या साडीच्या लूकवर निकही फिदा झाला. या फोटोसह त्याने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला ‘जस्ट लुकिंग लाईक अ वॉव’ हा डायलॉगही कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दरम्यान, प्रियांकाचा साडीतील लुक चाहत्यांच्याही पसंती पडला आहे.
नुकतीच प्रियांका मामी फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आली होती. या टूरमध्ये तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावली. शिवाय मरिन ड्राईव्हवरलाही भेट देत फोटोशूट केले होते.
त्यानंतर मुंबईवरुन पुन्हा अमेरिकेला जाताना तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबईची एक झलक शेअर केली होती. सोबतच पोस्टमध्ये लिहिले होते की, “Wil miss u mumbai. अलविदा मेरी जान.. लवकरच भेटू.” दरम्यान, परदेशातही प्रियांका भारतीय सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करते. नुकतेच तिने करवा चौथ साजरा केला.