बॉलिवूडमधील बादशाह अर्थात शाहरुख खानचे भारताच नव्हे तर जगभरात अनेक चाहते असून त्याला जगभरातील अनेक संस्थांनी सम्मानित केलेले आहे. आता मेलर्बन येथील ट्रोब यूनिव्हर्सिटीची मानद डॉक्टरेट पदवीने त्याचा गौरव करण्यात आला आहे. हा सन्मान हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत शाहरुख खानला प्रदान करण्यात आला. मानवतावादी तत्त्वांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याने दिलेल्या कार्याची दखल घेवून त्याला ही पदवी देण्यात आली आहे.
शाहरुख खान हा 10व्या मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये चीफ गेस्ट म्हणून सहभागी झाला होता. या सन्मानार्थ शाहरुख म्हणाला, ला ट्रोबसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठाकडून हा सन्मान मिळणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. या विद्यापिठाचा भारतीय संस्कृतीसोबचे दिर्घकाळीन संबंध असून महिलांना समान अधिकार देण्यासाठी त्यांनी आवाज उठविला होता.
ला ट्रोब ही ऑस्ट्रेलियातील पहिले विद्यापीठ आहे ज्यांनी शाहरुख खानला मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. तसेच फिल्म फेस्टिवलमध्ये शाहरुखला “इक्सिलेंस इन सिनेमा’ या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना शाहरुखने “अपना टाइम आएगा’ या गाण्यावर मुलांसोबत डान्सही केला.
दरम्यान, शाहरुख हा आनंद एल राय यांच्या “झिरो’ चित्रपटात अखेरच्या वेळी झळकला होता. यात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही. त्यानंतर शाहरुखने अद्याप कोणताही चित्रपट साईन केलेला नाही.