Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मुख्य बातम्या

विविधा: जनरल अरुणकुमार वैद्य

by प्रभात वृत्तसेवा
August 10, 2019 | 7:30 am
A A
विविधा: जनरल अरुणकुमार वैद्य

माधव विद्वांस

भारताचे 13 वे लष्करप्रमुख जनरल अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 27 जानेवारी 1926 रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. त्यांचे वडील श्रीधरपंत सरकारी अधिकारी होते. आईचे नाव इंदिरा, तर पत्नीचे नाव भानुमती. त्यांचे शालेय शिक्षण अलिबाग येथे व पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. एल्फिन्स्टन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असतानाच सन 1944 मधे त्यांनी सैन्यात कॅडेट म्हणून प्रवेश मिळविला. भारताच्या स्वातंत्र्याच्या थोडेच दिवस आधी त्यांची सेवा 7 मे 1947 रोजी लेफ्टनंट म्हणून नियमित करण्यात आली होती. भारतीय लष्करातील अत्यंत बुद्धिमान, शूर आणि धाडसी लष्करप्रमुखांमध्ये त्यांची गणना होते. सन 1958-59 मध्ये वेलिंग्टन (तमिळनाडू राज्य) येथे त्यांनी डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधील शिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते लडाखमध्ये एक वर्ष कामगिरीवर होते. काही काळ दिल्ली येथे सैनिकी सचिवाच्या विभागात लेफ्टनंट कर्नल म्हणूनही त्यांनी काम केले.

1965 सालच्या भारत-पाक युद्धाच्या वेळी ते लेफ्टनंट कर्नल या पदावर होते. त्यांच्याकडे डेक्‍कन हॉर्स विभागाचा पदभार देण्यात आलेला होता. या युद्धात आपल्या बुद्धीची आणि कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवीत त्यांनी चिमा भागात अतिशय चोख कामगिरी बजावली. या त्यांच्या शौर्यासाठी त्यांना महावीरचक्र प्रदान करण्यात आले होते.

सन 1971 सालच्या भारत-पाक युद्धाच्या वेळी वैद्य “झफरवाल’ विभागाचे ब्रिगेडिअर होते. तेथील युद्धभूमीत जमिनीत पेरलेले सुरूंग होते. त्यावेळी जनरल वैद्य यांनी असामान्य धाडस दाखविले आणि स्वत: सुरुंगातून रस्ता मोकळा करून आपल्या संपूर्ण तुकडीस पुढे घेऊन गेले. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यावर यशस्वी हल्ला करता आला. त्याच युद्धात बसंतर येथील कारवाईत आपल्या कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवीत भारतीय रणगाडे सहिसलामत पुढे नेले व पाकिस्तानचे 62 रणगाडे नेस्तनाबूत केले. या त्यांच्या असामान्य धाडसाबद्दलही त्यांना पुन्हा एकदा महावीरचक्र प्रदान करण्यात आले. 31 जुलै 1984 रोजी जनरल वैद्य भारताचे तेरावे लष्करप्रमुख बनले. त्यांच्याच कारकिर्दीत अमृतसरच्या सुवर्णमंदिरात ठाण मांडून बसलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या खलिस्तानवादी अतिरेक्‍यांना हुसकावून लावण्यासाठी “ऑपरेशन ब्लू स्टार’ पार पडले. या कारवाईचे संपूर्ण नियोजन जनरल वैद्य यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आले होते.

31 जानेवारी 1986 रोजी चाळीस वर्षांची प्रदीर्घ देशसेवा केल्यानंतर ते लष्करातून निवृत्त झाले आणि पुणे येथे वास्तव्यास आले. पुण्यातील लष्कर भागात 10 ऑगस्ट 1986 रोजी सायंकाळी पत्नीसह आपल्या कारमधून घरी परत येत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर आठ ते नऊ गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांच्या पत्नीला चार गोळ्या लागून त्याही जखमी झाल्या होत्या. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर अतिविशिष्ट सेवापदक आणि पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. निधड्या छातीच्या लष्करप्रमुखांना सॅल्यूट.

Tags: editorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : पिक्‍चर अभी बाकी हैं
अग्रलेख

अग्रलेख : पिक्‍चर अभी बाकी हैं

16 hours ago
लक्षवेधी : अणुयुद्धाची छाया
संपादकीय

लक्षवेधी : अणुयुद्धाची छाया

16 hours ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : आवश्‍यक वस्तूंचे भाव 20 ते 40 टक्‍क्‍यांनी खाली आले

16 hours ago
अबाऊट टर्न : घड्याळ
संपादकीय

अबाऊट टर्न : घड्याळ

16 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा नेता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘नियुक्तीच्या प्रतेक्षेतील ‘त्या’ ७० हजारांहून अधिक उमेदवारांचा कार्यकाळ…’ मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ला ‘सर्वोच्च’ आव्हान

परग्रहवासीयांनी पृथ्वीवर ‘असा’ केला करोना महामारीचा फैलाव – हुकूमशहा किम जोंगनामे तोडले अकलेचे तारे

पंजाबनंतर केजरीवालांचे मिशन गुजरात; प्रदीर्घ काळपासून सत्तेत असलेल्या भाजपला ‘तीन’ मुद्द्यांवरून घेरणार

पुण्यातही शिंदे गटाला मिळणार ताकद

जम्मू-काश्मीरात भाजपला दूर ठेवण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी एकत्र लढणार

Rain Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

नांदेड-पुणे रेल्वेचा शुभारंभ | मराठवाड्यात रेल्वेची कनेक्टीव्हीटी वाढविण्यावर भर – मंत्री रावसाहेब दानवे

शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्र सरकारच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र ठरला ‘टॉप परफॉर्मर’

Most Popular Today

Tags: editorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!