मुंबई – चित्रपट ‘हाउसफुल 3’ ला रिलीज होऊन ३ जुनला सात वर्ष पूर्ण झाले. या खास निमित्याने अभिनेता चंकी पांडे आणि अभिनेत्री नरगिस फाखरीने सोशल मीडियावर या चित्रपटाच्या आठवणींनी शेअर केल्या आहे. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये या चितपटातील स्टार कास्ट आहे. यासोबत ‘साजिद नाडियाडवाला यांच्या हाउसफुल ३ ला ७ वर्ष झाल्याचे सेलेब्रेट केले आहे.
अभिनेत्री नरगिसने इंस्टाग्रामवर जबरदस्त एंटरटेनमेंट लिहीत काही फोटो व्हिडिओ शेअर केले आहे. शानदार कॉमेडी चित्रपटाचे सात वर्ष पूर्ण असेही लिहिले आहे. दरम्यान चित्रपट २०१६ रिलीज झाला होता. साजिद-फरहाद यांनी हा चित्रपट निर्देशित केला होता तर या चित्रपटाचे प्रोड्यूसर साजित नाडियाडवाला होते.
अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलिन फर्नांडिस, लिसा हेडन यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाची कथा तीन मित्रांच्या आयुष्याभोवती फिरते. अभिषेक बच्चन, रितेश देशमुख आणि अक्षय कुमार यांनी तीन मित्रांच्या भूमिका केल्या होत्या. तर, जॅकलिन, लिसा हेडन आणि नर्गिस मुख्य भूमिकेत दिसल्या. काही गैरसमजांमुळे मुलींचे वडील (बोमन इराणी) त्यांच्या लग्नाला विरोध करताना दिसले.