बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नरगिसने 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या रॉकस्टार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यासाठी तिला बेस्ट डेब्यू हा फिल्मफेअरचा अवॉर्डही देण्यात आला होता. तिची या चित्रपटातली भूमिका आणि तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. दरम्यान अभिनेत्रीच्या नवीन फोटोने खळबळ उडवून दिली आहे. नर्गिसच्या बोल्ड स्टाइलची बरीच चर्चा आहे. अभिनेत्रीच्या लूकचे चाहते वेडे झाले आहेत.
नर्गिसने तिचे नवे फोटोशूट ब्रालेस लूकमध्ये केले आहे. नर्गिसचे नवे फोटो ब्रालेस लूकमध्ये येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते खळबळून जागे झाले आहेत. फोटोंमध्ये नर्गिस पांढऱ्या शॉर्ट स्कर्टसह पांढरा ब्लेझर परिधान करताना दिसत आहे. नर्गिसने ब्लेझरखाली काहीही घातलेले नाही. अभिनेत्रीचा हा लूक खूपच किलर आहे.
नर्गिस चित्रपटाच्या पडद्यावर भलेही सक्रिय नसेल, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्याची एकही संधी सोडत नाही. नर्गिस सध्या तिच्या ब्रेलेस लूकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या या फोटोंना चाहत्यांकडून दाद मिळत आहे. कोणी नर्गिसला हॉट म्हणत आहेत तर कोणी फायर इमोजीसह आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.