मुंबई – ट्विंकल खन्ना नेहमीच इन्टाग्रामवर आपल्या वैयक्तिक जीवनाबाबत अप अँड डाउन आपल्या लाईफचे अपडेट शेअर करीत असते. तर कधी अजब – गजब पोस्ट करीत सोशल माध्यमांमध्ये चर्चेत असते. यातच पुन्हा एकदा तिने एक अनोखी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची वैशिष्टय म्हणजे एक सर्पमित्र एका महाकाय किंग कोब्राला पकडताना दिसतो आहे. सध्या या पोस्टला काही क्षणातच ९० हजार पेक्षा जास्त लाईक मिळाले आहे.
ट्विंकलने इन्टाग्रामवर ट्वीक इंडियाचा अकाउंटवरील पोस्टला रिपोस्ट करीत लिहिले आहे की,’आपल्या आजीने सांगितलेल्या साप बघितल्यास धन प्राप्त होते या दंतकथेच्या आधारावर बॅंगलोरमधील जॉस मैस्कैरेनहास म्हणजेच किंग ऑफ कोबरा हे सर्पमित्र अब्जाधीश आहे.’
दरम्यान, ट्विंकलने इन्टाग्रामवर ट्वीक इंडियाचा अकाउंटवरील पोस्टला रिपोस्ट केलेल्या फोटोतील सर्पमित्र हा बॅंगलोर रहिवासी आहे. या सर्पमित्राचे नाव जॉय मैस्कैरेनहास आहे. त्याला बॅंगलोर येथील स्थानिक लोक किंग ऑफ कोबराज या नावाने सुद्धा ओळखतात. जॉय यांनी आतापर्यंत सहा हजार सापांना वाजविले आहे. यातील 185 हे विध्वंसक किंग कोबरा होते.