सर्जा-राजा सासवडकडे रवाना

सोमेश्‍वरनगर – सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळ कुटुंबीयांची सर्जा-राजाची बैलजोडी संत सोपानकाका महाराज पालखी ओढण्यासाठी सासावड (ता. पुरंदर)कडे गुरुववारी (दि. 27) रवाना झाले.

भोई समाजातील लोकांची पालखी वाहून नेण्याची परंपरा 126 वर्षांपूर्वी आकारास आली असून सोपानकाका पालखी रथासाठी काही वर्षांनी बैलाच्या सहाय्याने पालखी ओढून नेता यईल, असा रथ तयार केला गेला. सोरटेवाडीतील स्व. बापुसाहेब बालाजी केंजळे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. सेवेकरी असल्यामुळे बापुसाहेब केंजळे यांच्याकडे मान आला. बापुसाहेबानंतर त्यांचा मुलगा व सोमेश्‍वर कारखान्याचे संचालक स्व. विठ्ठलराव केंजळे यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे. सोमेश्‍वर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. बाबालाल काकडे यांच्या सहकाऱ्याने या पालखी रथाची कलाकृती समवेत व नंतरच्या काळात सोमेश्‍वर कारखान्याने संपूर्ण पालखी सोहळ्यासाठी रथ कालाकृतीसह प्राप्त करून दिला. तीन वर्षांपासून या रथाची सोय सासवड येथे सोपान काका बॅंकेचे अध्यक्ष संजय जगताप सासवड येथे करीत असून 2005 पासून पालखी सोबत नगारा वाहून नेण्यासाठी सोरटेवाडी येथील नितीन कुलकर्णी व राजेंद्र कुलकर्णी यांनी जोडी दिली आहे. 2006 मध्ये केंजळे कुटुंबीयांची परंपरा खंडीत झाली होती; परंतु तीच परंपरा विकास केंजळे, नितीन कुलकर्णी व संतोष केंजळे यांनी प्रथा अखंडचालू ठेवली आहे.

शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश काकडे व सोमेश्‍वर करखान्याचे संचालक विशाल गायकवाड यांनी गुरुवारी सर्जा-राजा जोडी पूजन केले तर पौराहित्य प्रभाकर बोकील यांनी केले आहे. यावेळी सोरटेवाडीचे सरपंच दत्तात्रय शेंडकर, उपसरपंच संभाजी संभाजी कर्चे, करंजेपूल सरपंच वैभव गायकवाड, डॉ. सोमप्रसाद केंजळे, गुलाब गायकवाड, धोंडीराम सोरटे, कैलास मगर, नामदेव गायकवाड, विलास पवार, सुरेश शेंडकर, श्रीपाल सोरटे, बबन पवार, माणिक लकडे, शिवाजी शेंडकर, बाळासाहेब गायकवाड, विजय राजवडे, विकास केंजळे, संतोष केंजळे, प्रसाद केंजळे, ऋचा केंजळे, अरुंधती केंजळे, रागिणी कुलकर्णी, मोरेश्‍वर कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, विजय कुलकर्णी तसेच सोरटेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.