नवी दिल्ली – अमेरिकेत भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांची संशयास्पद मृत्युची मालिका सुरुच असून, अवघ्या एका महिन्यातली सहावी आणि आठवड्यातील तिसरी घटना घडली आहे. गुरुवारी अमेरिकेत भारतीय वंशाचा विद्यार्थी श्रेयस रेड्डी बेनिगर हा मृतावस्थेत आढळून आला. 19 वर्षीय श्रेयस हा ओहायो येथील लिंडर स्कूल ऑफ बिझनेसचा विद्यार्थी होता. श्रेयसचे आई-वडील हैदराबादमध्ये राहतात.
पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणताही चुकीचा खेळ किंवा द्वेषपूर्ण गुन्हा होण्याची शक्यता नाकारली आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय मिशनने श्रेयसच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केले असून त्याच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू असल्याचे म्हटले आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला, नील आचार्य – पर्ड्यू विद्यापीठातील विद्यार्थी मृतावस्थेत आढळला होता. रविवारी त्यांच्या आई गौरी यांनी नील बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. काही तासांनंतर, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये नीलचा मृतदेह सापडला. त्याची आई गौरीने त्याला शोधण्यासाठी सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये मदत मागितली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याला शेवटचे उबेर ड्रायव्हरने पाहिले होते ज्याने त्याला कॅम्पसमध्ये सोडले होते.
दुसऱ्या एका प्रकरणात, हरियाणाच्या पंचकुलाचा रहिवासी विवेक सैनी याला जॉर्जियाच्या लिथोनियामध्ये १६ जानेवारीला एका बेघर माणसाने मारहाण केली. जॉर्जियाच्या लिथोनियामध्ये एमबीएच्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या विवेक सैनी एका स्टोअरमध्ये अर्धवेळ काम करत होता. त्याने माणुसकीच्या नात्याने एका बेघर ज्युलियन फॉकनरला आश्रय दिला होता. सैनीने त्या व्यक्तीला वेळोवेळी चिप्स, पाणी आणि एक जॅकेटही दिले होते. १६ जानेवारी रोजी फॉल्कनरला मोफत अन्न देण्यास विवेकने नकार दिला आणि त्यामुळे फाॅकनरने विवेकला बेदम मारले होते.
अकुल धवन हा आणखी एक भारतीय विद्यार्थी जानेवारीत इलिनॉय अर्बाना-चॅम्पेन विद्यापीठाबाहेर मृतावस्थेत आढळला होता. 18 वर्षीय मुलाचे शवविच्छेदन सुचवते की त्याचा मृत्यू हायपोथर्मियामुळे झाला. तथापि, अकुल धवन बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यानंतर धवनच्या पालकांनी विद्यापीठाच्या पोलिस विभागावर निष्काळजीपणा आणि निष्क्रियतेचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.