मेलबर्न – भारतीय महिला संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा स्थगित करण्यात आला आहे. करोनाच्या नव्या स्वरुपातीलविषाणू संसर्गाचा धोका वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा धोका कायम असताना भारताच्या पुरुष संघाचा दौरा सुरू राहणार असून उर्वरित दोन कसोटी सामने ठरलेल्या वेळापत्रकानूसारच होतील, असे बीसीसीआय व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे.
महिला संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 22 ते 28 जानेवारी दरम्यान होणार होती. कॅनबेरा, मेलबर्न व होबार्ट येथे हे सामने होणार होते. यंदाच्या मोसमात रद्द झालेला हा दौरा आता पुढील वर्षी मार्च किंवा एप्रिलमध्ये घेण्यात येईल व तेव्हा मालिकेत तीन टी-20 सामने होतील, असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
It’s just been confirmed that our series against India, originally scheduled for next month, has been postponed until next season ahead of the 2022 Cricket World Cup in New Zealand.
Looking forward to a big year ahead! pic.twitter.com/kZ5zkU6ZXu
— Australian Women’s Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) December 31, 2020
नव्या दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्यावर जाहिर केल्या जाणार आहेत. भारतीय महिलांना त्यामुळे आपल्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठी वाट पहावी लागणार आहे. भारतीय महिला आपला अखेरचा सामना मेलबर्न येथे गेल्यावर्षी खेळला होता. तो सामना भारताने 85 धावांनी गमावला होता.