किव्ह – रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असून त्यात सर्वसामान्य व्यक्तींसह काही महत्वाच्या व्यक्तीही सहभागी होताना दिसत आहेत. रशियाविरुद्धचा असंतोष दररोज वाढत असून त्याविरोधात आता खेळाडूही बॅटलफिल्डवर उतरले आहेत.
रशियाच्या विरोधात याला प्रतिकार करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेस्की यांनी रशियाचे आक्रमण थोपवण्यासाठी हातात शस्त्रे घेण्याचे आवाहन केले होते. युक्रेनचा टेनिसपटू सर्गिये स्टॅकोस्कीनेही टेनिस रॅकेट सोडून आता देशासाठी बंदुक हातात घेतली आहे. माझ्या देशाच्या अस्मितेसाठी व अखंडतेसाठी शस्त्र हाती घेतल्याचे त्याने म्हटले आहे.