लाहोर – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ तब्बल 24 वर्षांनी पाकिस्तानात दाखल झाला आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानबरोबर 3 कसोटी, 3 एकदिवसीय सामने व 1 टी-20 सामना खेळणार आहे.
मालिकेचा पहिला सामना 4 मार्चपासून रावळपिंडीत सुरू होईल. ऑस्ट्रेलियाचा संघ 1998 सालानंतर पहिल्यांदा पाकिस्तानचा दौरा करत आहे. ऑस्ट्रेलिया नंतर इंग्लंडही पाकिस्तानचा दौरा करणार आहे. त्यामुळे पाकिस्तानातील क्रिकेटला नवसंजिवनी मिळणार आहे. मात्र या दौऱ्यावर दहशतवादाचे सावट कायम असणार आहे.