ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले

लंडन : ज्येष्ठ विधीज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. काल त्यांनी लंडनमधील चर्चमध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डशी विवाहबद्ध झाले. हे या दोघांचेही दुसरे लग्न आहे. 65 वर्षीय हरीश साळवे यांनी या वर्षाच्या सुरुवातीला पत्नी मीनाक्षी साळवे यांना घटस्फोट देऊन 38 वर्षांचा संसार मोडला. हरीश-मीनाक्षी साळवे यांना साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत.

कॅरोलिन 56 वर्षांच्या असून त्या व्यवसायाने कलाकार आहेत. त्यांना एक मुलगीही आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड यांची भेट झाली होती. यानंतर या दोघांच्या भेटी वाढल्या. नंतर घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला.

हरीश साळवे यांनी दोन वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे हे लग्न ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लंडनमधील चर्चमध्ये पार पडले. चर्चमधील या छोटेखानी विवाह समारंभात केवळ 15 लोक सहभागी झाले होते. ज्यात दोघांचे कुटुंबीय आणि काही खास मित्रपरिवारा सहभाग होता. दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासह इतर अनेक आंतरराष्ट्रीय प्रकरणांमध्ये हरीश साळवे यांनी भारत सरकारची भक्कम बाजू मांडली होती. तसंच देशातील उद्योजक, वोडाफोन, रिलायन्स, मुकेश अंबानी, रतन टाटा यांचे खटलेही हरीश साळवे यांनी लढले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.