मंचर – अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे एचपी गॅस सिलिंडर दर बुधवारी दुपारी एक वाजता येत असल्याने सिलिंडर नेण्यासाठी ग्राहकांना दुपारपर्यंत वाट पहावी लागते. त्यातच उन्हाचा कडाका वाढला असल्याने सकाळी दहा वाजता गॅसची गाडी यावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
अवसरी बुद्रुक,टाव्हरेवाडी गावातील ग्राहकांसाठी कळंब येथील गॅस डिलरकडून सिलिंडर टाकीचे वितरण दर बुधवारी दुपारी एक वाजता अवसरी बुद्रुक येथे करण्यात येते.
त्यामुळे ग्राहक सकाळी नऊ वाजताच रिकामी सिलिंडर घेऊन येवून नंबर लावतात. मात्र, दुपारी एकपर्यंत ग्राहकांना उपाशीपोटी गाडीची वाट पहावी लागते. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हॉटेल बंद असून पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने ग्राहक वैतागून जात असल्याने सकाळी 10 वाजता गाडी यावी, अशी मागणी होत आहे.