कॅनडात बंदुकधाऱ्याकडून अंदाधुंद गोळीबार

एका पोलीस अधिकाऱ्यासह १६ जणांचा मृत्यू

नोव्हा स्कॉटिया  : कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांतामध्ये एका बंदूकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली आहे.  या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री सुरु झालेला हा हिंसाचार रविवारी सकाळी थांबला.

पोलिसांनी या हल्लेखोराला संपवल्यानंतर तब्बल १२ तासांनी नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ग्रॅबियल वॉर्टमॅन असे या हल्लेखोराचे नाव आहे. कॅनडाच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात भीषण हत्याकांड आहे. या गोळीबारामागे हल्लेखोराचा उद्देश स्पष्ट झालेला नाही.

वॉर्टमॅन रॉयल कॅनडीयन माऊंटन पोलिसांच्या गणवेशामध्ये होता. त्यामुळे मनात आले म्हणून त्याने हे कृत्य केले, यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नाहीत. वॉर्टमॅनने सर्वप्रथम रात्री ११.३०च्या सुमारास गोळीबार केला. त्यानंतर तब्बल १२ तासांनी स्थानिक पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्याचा खात्मा झाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.