हडपसर – जीवन बापू जाधव यांचे विद्यार्थी परिषद पासून सामाजिक काम सुरू आहे. कोरोना काळात सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं कामही जीवन बापूंनी केले आहे. समाजासाठी झटणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून जीवन बापूंना महापालिकेत पाठवा. सबका साथ सबका विकास हे भारतीय जनता पक्षाचे काम आहे. त्यामुळे या परिसराचा विकास करण्याची संधी जीवन जाधव यांना द्यावी, असे आवाहन भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांनी केले.
भारतीय जनता पक्षाचे माजी शहर उपाध्यक्ष जीवन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार सुनिल कांबळे बोलत होते. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष माजी आमदार जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, राजेश पांडे, नगरसेवक मारुती आबा तुपे,माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक साईनाथ बाबर, शशिकांत कुलकर्णी, भूषण तुपे, संदीप दळवी, संजय शिंदे, अमित गायकवाड,संकेत झेंडे, गणेश घुले, आप्पा डांगे, सोपान लोंढे, चंद्रकांत घुले, अंकुश घुले, जाधव ज्ञानेश्वर, पोपट आंबेकर, लगडताई, स्मिता गायकवाड, योगेश सुर्यवंशी ,बाळासाहेब भानगिरे, चंद्रकांत भानगिरे , भगवान चव्हाण, राजेंद्र तरवडे ,दीपक जरांडे, महेश झुरुगे, योगेश ढोरे, शिवाजी शेवाळे, डॉ. मंगेश वाघ , डॉ .अशोक जैन, डॉ .शोभनाथ यादव, संजय भुजबळ, बापु मिरेकर,हेमंत वाडकर, विठ्ठल वाडक ,हर्षल जाधव, हनुमंत घुले ,नीलेश गारङे, सतिश वायंदड, माऊली जाधव, सुधिर जाधव, मयुर जाधव, अभिजीत सातव, स्वप्नील सातव, आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आता मला संधी द्या – जीवन जाधव
समाजात जे-जे चांगलं आहे ते आपण अंगिकारले पाहिजे. चांगले ते निवडलं पाहिजे. यापूर्वी येथे निवडून गेलेल्यानी आजवर काय विकास केला ? ते आपण पाहत आहोत.त्यामुळे विकासाची दूरदृष्टी असणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला महापालिकेत या भागाचे प्रतिनिधित्व करण्याची एक संधी द्यावी, असे भावनिक आवाहन भाजपचे माजी उपाध्यक्ष जीवन जाधव यांनी केले.