चिंबळी – गेल्या दोन वर्षांपासून करोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव असूनही आळंदी, चिंबळी परिसरात प्रसिद्धी माध्यमांद्वारे जनजागृती करणारे पत्रकार एम. डी. पाखरे व सुनिल बटवाल यांचा आळंदीत गौरव करण्यात आला.
आपल्या कुटुंबांची व जीवाची पर्वा न करता गोरगरीबांना ज्ञान देण्याचे काम केले असल्याने संत सावता महाराज माळी सेवा मंडळ आळंदी यांच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले. या दोघांसह पत्रकार ज्ञानेश्वर फड, अर्जुन मेदनकर यांचा सत्कार राजेंद्र गोरे, महेश गोरे, अनिल नरके, समीर गोरे, आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या अलंकापुरी नगरीमध्ये श्रीसंत शिरोमणी सावता महाराज यांचे मंदिर व महत्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणीच्या कार्याला मदतीसाठी हातभार लागावा, यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी हा सत्कार करण्यात आला.