मुंबई – गौतमी पाटीलच्या लावणीने अल्पावधीतच अनेकांना वेड लावले आहे. सध्या तिच्या लावणीची लोकप्रियता प्रचंड वाढल्याचे दिसते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. लोक लांबून गौतमीचा कार्यक्रम ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सुरुवातीला अश्लील डान्स केल्याप्रकरणी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. मात्र त्यानंतर तिने जाहीर माफी मागितली. मात्र पुन्हा एकदा गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
गौतमी पाटीलचे हजारो चाहते आहे. अनेकजण तिला विविध भेटवस्तू देतात. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर तिला मिळालेल्या सर्व भेट वस्तूंचे फोटो शेअर केले होते. मात्र यातील एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्यावर पुन्हा एकदा टीका होऊ लागली.
View this post on Instagram
एका स्केचमध्ये विठ्ठलाच्या फोटोपुढे गौतमीचं स्केच काढल्याचे दिसते. हे पाहून काही नेटकरी भडकले आहेत. ‘ह्या बाईचा आमच्या देवापुढे फोटो लावू नका’,’विठ्ठलासोबत ह्या बाईचा फोटो का ठेवला? देव आहे का ही…पागल आहे तो फोटो कोणी केला तो’ अशा प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.