मुंबई – साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध सुपरस्टार कमल हसन हळूहळू चित्रपटांच्या दुनियेत पुनरागमन करत आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘विक्रम’ चित्रपटाच्या यशानंतर कमल हसन चित्रपटांच्या दुनियेत सक्रिय झाला.कमल हसन नुकतंच ‘PS 2’ चे निर्माते आणि चित्रपटाच्या कलाकारांचे कौतुक केले.हा चित्रपट चोल वंशाच्या राजवटीची आणि त्याच्या साम्राज्याची कथा सांगणारा आहे.
पीएस 2 हा सध्या साऊथ इंडस्ट्रीमधील सर्वात चर्चित आणि बिग बजेट सिनेमा आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, कमल हसनने पोनीयिन सेल्वन 2 चे निर्माते मणिरत्नम आणि चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले आहे. यासोबतच कमल हसनने मणिरत्नमसोबतच्या मैत्री बद्दलही भाष्य केले आहे. तो म्हणाला, ‘मी एक कलाकार, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सर्व काही आहे. दुसरी, माझी पहिली ओळख म्हणजे मी सिनेमाचा चाहता आहे आणि मी तमिळ आहे. त्यामुळे मला खूप अभिमान आहे की तामिळ भाषेतील तांत्रिक कौशल्य आणि अद्वितीय प्रतिभा आता प्रत्येकासाठी आणि जगासाठी उपलब्ध आहे. एकंदरीत, मी केवळ कथेत सामील असलेल्या स्टार्सबद्दल बोलत नाही आणि मला वाटते की याचे श्रेय मणिरत्नम यांना जाते.
मणिरत्नम यांनी मोठ्या हिमतीने अशा प्रकारचा चित्रपट तयार केला आहे. तमिळ सिनेमा सुवर्णयुगाकडे वाटचाल करत आहे आणि हे चांगले लक्षण आहे. असं देखील कमल हसन यावेळी म्हणाला. ‘पोनियिन सेल्वन 2’ हा मणिरत्नम दिग्दर्शित 2022 मध्ये आलेल्या ‘पोनियिन सेल्वन 1’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. कमल हसनने या चित्रपटाच्या नरेशनसाठी आपला आवाज दिला आहे.
ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘पोनियिन सेल्वन 2′ ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.’पोनियिन सेल्वन 2’ मध्ये विक्रम, कार्ती, जयम रवी, ऐश्वर्या राय बच्चन, त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, शोभिता धुलिपाला, प्रकाश राज, जयराम, प्रभू, आर सरथकुमार, पार्थिवन आणि विक्रम प्रभू यांच्या भूमिका आहेत.