पुणे – इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेची दुसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी (दि.6) जाहीर झाली. यात 5 हजार 555 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. यापैकी 3 हजार 142 जणांना प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. या फेरीतील विद्यार्थ्यांना 8 जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त जागांवर अकरावीची दुसरी विशेष फेरी राबविण्यात येत आहे. बुधवारी गुणवत्ता यादी व कटऑफ जाहीर झाला. दुसऱ्या विशेष फेरीत वाणिज्य शाखेतून 2 हजार 650 विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. यानंतर विज्ञान शाखेतून 2 हजार 132 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले.
कला शाखेत 573, तर व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी 200 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. माध्यमनिहाय महाविद्यालय मिळालेल्या संख्येनुसार राज्य शिक्षण मंडळाचे सर्वाधिक 4 हजार 924, सीबीएसईचे 409, आयसीएसईचे 153, आयजीसीएसईचे 5, एनआयओएसचे 57 आणि इतर माध्यमाच्या 7 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले असल्याचे अकरावी प्रवेश समितीकडून कळविण्यात आले.
नामांकित महाविद्यालयातील कटऑफ
सिंबायोसिस कॉलज : वाणिज्य (89. 40%)
आबासाहेब गरवारे कॉलेज : कला (67. 60%), विज्ञान (91.40%)
मॉडर्न ज्युनिअर कॉलेज : विज्ञान (80.80%)
सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य (79.80%), विज्ञान (82%)
डॉ. शामराव कलमाडी हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : विज्ञान (91.20%)
सर परशुरामभाऊ ज्युनिअर कॉलेज : वाणिज्य (90. 80%)
एस. एम. जोशी कॉलेज : वाणिज्य (80.60%), (विज्ञान 88.20%)
नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स : वाणिज्य (80.80%)
एस. एम. चोक्सी हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज : विज्ञान (82%)