हडपसर – सेलेना पार्क पाण्याच्या टाकीचे एकदा लोकार्पण झालेले असताना माजी नगरसेविका व भाजपने पुन्हा केलेल्या या कार्यक्रमाचा शिवसेनेकडून झेंडे दाखवत व घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. दरम्यान,कार्यक्रम स्थळी कायदा व सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये या करता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलिसांनी आव्हान केल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत निषेध व्यक्त करून कार्यक्रम स्थळ सोडले.
या निषेध आंदोलनाच्या वेळी उल्हास तुपे,नितीन गावडे,अभिमन्यू भानगिरे,इंतूभाई शेख , सचिन तरवडे,प्रवीण हिलगे ,योगेश सातव,गोरख पांचाळ,विश्वास पोळ,संतोष जाधव ,आण्णा दायगुडे,विजय गब्दुले ,सिद्धार्थ भानगिरे , बाबू होळकर,अयोध्या आंधळे आदिंसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. महापालिकेच्या माध्यमातून काळेपडळ येथे सुरू झालेल्या सेलेना पार्क पाण्याच्या टाकीचे लोकार्पण २२ एप्रिल२०२२ रोजी मंत्री उदय सामंत व माजी मंत्री सचिन अहिर यांचे हस्ते झाले होते.
शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नाना भानगिरे म्हणाले की याच नगरसेविकेने काम संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत काम पूर्ण करण्यासाठी आम्हांला आव्हान दिले होते. त्यानंतर मी मंत्री एकनाथ शिंदे, महापालिका व पाणीपुरवठा अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी रात्रंदिवस उभा राहून काम करून घेतले. सध्या या पाण्याच्या टाकीतून नागरिकांसाठी पाणी सोडले जात असून या ठिकाणी परिसरातील नागरिक आनंदही व्यक्त करत आहेत. मात्र, माजी नगरसेविका व भाजपने पाण्याच्या टाकीचा लोकार्पणाचा स्टंट उभारला आहे .
जनतेच्या पैसातून आणि शिवसेनेच्या पाठपुराव्यातुन झालेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचाच हा लाजिरवाणा प्रकार आहे. असे सांगत सध्या बंद असलेले सय्यदनगर व काळेपडळ ही दोन्हीही रेल्वेगेट भाजपने नागरिकांना वाहतुकीस खुली करून द्यावीत.केंद्रात त्यांची सत्ता असल्याने त्यांना ते शक्य आहे.असे आव्हान भानगिरे यांनी भाजपला केले आहे.
काळे-बोराटेनगर तसेच हांडेवाडी रोड भागातील सोसायट्या व नागरिकांना खास करून माझ्या महिला भगिनींना जोपर्यंत समाधानकारक पाणी जात नाही. तोपर्यंत मी किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य महापालिका निवडणूक लढविणार नाही.
प्रमोदनाना भानगिरे
माजी नगरसेवक शिवसेना.