#Seasonalfruits : सीताफळ एक फायदे अनेक

हल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सिताफळाचे गुणकारी फायदे जाणून घ्या. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असणाऱ्या सीताफळाचे खालील फायदे नक्की वाचा.

सीताफळाचे फायदे

कर्करोग
अँटीऑक्सिडंट गुणांनी युक्‍त सीताफळ शरीरातील फ्री रॅडीकल्सपासून बचाव करते. त्यामुळे कर्करोगासारख्या रोगांपासून बचाव होतो.

स्थूलपणा 
सीताफळातील नैसर्गिक साखरेत कॅलरीज असतात परंतु त्यामुळे मेटाबॉलिजम वाढते. त्यामुळे भूक नियंत्रित राहते आणि वजन कमी होते.

रक्‍ताल्पता
सीताफळात लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रक्‍ताची गुठळी होतेच त्याचबरोबर रक्‍ताची कमतरताही पूर्ण होते.

मजबूत हाडे
रोज सीताफळ खाल्ल्याने त्यातील मॅग्‍नेशिअम आणि कॅल्शिअम हाडांना मजबूत करून गुडघेदुखी, सांधेदुखी दूर करण्यास मदत होते.

गर्भवती 
गर्भवती स्त्रियांनी सीताफळाचे सेवन अवश्य करावे त्यामुळे भ्रूणाचा विकास तर होतोच पण गर्भवती स्त्रियांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राहाते.

द‍ृष्टी सुधारण्यासाठी 
सीताफळ रोज खाल्ल्यास नजर तेज होते त्याशिवाय चष्म्याचा नंबर कमी होणे किंवा जाणेही शक्य असते. त्याशिवाय सीताफळ खाल्ल्याने तणाव आणि नैराश्य दूर होण्यास मदत होते.

मधुमेह 
सीताफळातील कमी उष्मांक आणि हायपर ग्लायसेमिक गुणांमुळे रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहाते.

तोंडाचे आजार
सीताफळाच्या सालाने रोज सकाळी दात घासल्यास तोंडातून रक्‍त येणे, दातांचे किडणे, सूज आणि तोंडाचा दुर्गंध आदी समस्या दूर होतात.

हृदयरोग 
सोडियम आणि पोटॅशिअमचे प्रमाण सीताफळात भरपूर असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते आणि हृदयविकारापासून सुटका होते.

पचनक्रिया 
आतड्यातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकून पचन संस्थेचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. त्यामुळे छातीत जळजळ, पित्त, तोडाची साले निघणे आणि पोटात वायू होणे किंवा गॅस होणे आदी तक्रारी दूर होण्यास मदत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)